राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांचा सन्मान : शिशिर जावळे यांचा अनोखा उपक्रम:


भुसावळ:-येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांच्या साई निर्मल फॉउंडेशन भुसावळ तर्फे राष्ट्रीय मतदार दिनाचे ओचित्य साधून मतदारांचा सन्मान करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की 25जानेवारी ला राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीय मतदारांसाठी, नागरिकांसाठी अत्यन्त महत्वाचा आहे. यादिनाचे औचित्य साधून साईनिर्मल फौंडेशन भुसावळ च्या वतीने मतदारांना भगवत गीता, मनाचे श्लोक,तथा गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या दिवशी प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या देशाच्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी होऊन आपली जबाब दारी पार पाडून राष्ट्रनिर्मिती मध्ये मोलाचं योगदान दिले पाहिजे. कारण प्रत्येक मतदाराचे अमूल्य मतामुळे देशाच्या भविष्याचा व विकासाचा भक्कम पाया रोवला जातो.देशाच्या राजकीय प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी घेऊन आदर्श लोक प्रतिनिधी यांना निवडून दिले पाहिजे म्हणून मतदार राजा जागा हो लोकशाही चा धागा हो हि चळवळ प्रगल्भ करण्यासाठी मतदारांनि प्रत्येक मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे प्रतिपादन साईनिर्मल फौंडेशन भुसावळ चे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी याप्रसंगी मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी रोटरी रेल सिटी भुसावळ चे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, आर.के.कोळी,शेतकरी संघर्ष संघटनेचे देवेंद्र वराडे, हिंदू सेनेचे चंद्रशेखर पाटिलउपस्थित होते. याप्रसंगी राजेंद्र यावलकर, बळीराम पवार या मतदारांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास गोपाळ वाणी, बेंडाळे मॅडम, शोभा जावळे, पुष्पा वारके, डॉ. सरोदे,उपस्थित होते. कार्यक्रम यश स्वीततेसाठी भागवत पाटिल, कपिल पहुरकर, साहिल कासार, मोहन कासार, हितेंद्र तायडे यांनी परिश्रम घेतलेत सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक संस्थेचे प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील यांनी केले.