कोरोना सुसाटच : जळगाव जिल्ह्यात आढळले तब्बल 428 बाधीत :


जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत आहे. जळगावसह भुसावळ रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. जिल्ह्यात शनिवार, 22 जानेवारी रोजी एकाच दिवसात तब्बल 428 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

नव्याने एका रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 582 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 47 हजार 547 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 41 हजार 838 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. शनिवारी जळगाव शहरातील 42 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला तर शनिवारी 526 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 131
जळगाव ग्रामीण 08
भुसावळ 50
अमळनेर 41
चोपडा 80
पाचोरा 01
भडगाव 13
धरणगाव 03
यावल 12
एरंडोल 00
जामनेर 32
रावेर 02
पारोळा 03
चाळीसगाव 51
मुक्ताईनगर 00
बोदवड 31
अन्य जिल्हा 02