भुसावळात भरदिवसा सिनेस्टाइल घरफोडी: ते चौघे चारचाकीतून आले : अवघ्या 20 मिनिटात अपार्टमेंटमधील बंद घर फोडून दोन लाखांच्या रोकडसह लाखोंच्या दागिण्यांवर मारला डल्ला : हायप्रोफाईल चोरट्यांची सिनेस्टाईल चोरी ;


भुसावळ : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळील शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील समर्थ अपार्टमेंट भरदिवसा परिसरात चारचाकीतून आलेल्या हायप्रोफाईल चोरट्यांनी अवघ्या 20 मिनिटात भरदिवसा अपार्टमेंटमधील बंद घर फोडून दोन लाखांच्या रोकडसह लाखोंच्या दागिण्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली .
चोरीनंतर चोरटे चारचाकीतून पसार झाले.
भर दिवसा पडलेल्या घरफोडीने शहर व परिसरात खळबळ ;
येथील बिल्डींग मटेरीयल विक्रेता रघुनाथ चुडामण चौधरी हे शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंंटमध्ये कुटुंबासह राहतात. कुटुंबातील सून वगळता सर्व सदस्य शनिवार रोजी श्री क्षेत्र शिरसाळा मारोती येथे देव दर्शनासाठी गेले होते तर घरातील सूनबाई मुलासह अपार्टमेंटसमोरील नातेवाईकांकडे शनिवारी दुपारी 12.30 ते एक वाजेच्या दरम्यान गेलेल्या होत्या. याचवेळेत चारचाकीतून सुटा-बुटातील पाठीमागे बॅग लावलेले चोरटे अपार्टमेंटजवळ आले. तिघांनी सरळ अपार्टमेंटमध्ये पाय ठेवला तर एक जण वाहनात बसून मोबाईलवर बोलत राहिला. पाहुणे आले असावेत? म्हणून गल्लीतील लोकांनी दुर्लक्ष केले . वर गेलेल्या चोरट्यांनी मात्र सराईतपणे धारदार शस्त्राने दाराचा कडी-कोयंडा तोडत गोदरेज कपाटातील दोन लाखांची रोकड, 26 ग्रॅम वजनाचे दोन नेकलेस, लहान मुलांच्या अंगठ्या, कानातले टॉप्स असा सुमारे लाखोंचा ऐवज लंपास केला.
दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुनबाई प्लॅटमध्ये आल्यानंतर दरवाजा उघडा दिसताच सदर चोरीचा प्रकार उघड झाला.
घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नूतन पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्‍यांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली. त्वरीत घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले.