हिन्दी सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रविकान्त परदेशी यांची निवड :


भुसावळ – सात दशकांहूनही अधिकचा शैक्षणिक वारसा लाभलेल्या भुसावळातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था अर्थात हिन्दी सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रविकान्त परदेशी यांची निवड झाली आहे. पुणे येथील नामांकित बी.जे.मेडिकल कॉलेज येथून डॉ. रविकान्त परदेशी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. दीर्घ काळापासून आपल्या निष्णात आणि अचूक वैद्यकीय निदानाच्या क्षमतेमुळे डॉ. रविकान्त परदेशी हे ख्यातकीर्त आहेत.
प्रदीर्घ शैक्षणिक वारसा लाभलेल्या हिन्दी सेवा मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतांना मंडळाशी संबंधित सर्व पूर्वसूरींचे प्रयत्न आणि त्याग लक्षात ठेवत राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या तत्वांनुसार आणि स्व. श्री. डि.डि. शर्मा अर्थात भैय्याजींना अपेक्षीत शैक्षणिक उत्थानासाठी आपण प्रयत्नरत राहू असे डॉ. रविकान्त परदेशी यांनी सांगितले.
नवनिर्वाचित अध्यक्षांचा हिन्दी सेवा मंडल संचालित विविध शाळा आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळेस गाडगेबाबा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे, छात्रस्मृती महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एस. पाठक , डि.एल.हिन्दी विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.साहनी, गाडगेबाबा हिन्दी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.जोशी, गाडगेबाबा आय.टी.आय.चे प्राचार्य संजय शुकला, आणि सु.ग. टेमाणी हिन्दी कन्या विद्यालयाचे प्राचार्य मनोज माहेश्वरी इत्यादि उपस्थित होते.
हिन्दी सेवा मंडळाच्या सचिव श्रीमती एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.