भुसावळ:- कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगांव विभाग आंतर महाविद्यालयीन हँडबॉल (पुरुष) स्पर्धा दि 24 डिसेंबर 2021 रोजी के सी इ बी पी एड कॉलेज जळगांव येथे संपन्न झाल्या
या स्पर्धेत दा दे ना भोळे महाविद्यालयाने के सी इ पी जी महाविद्यालय जळगांव यांचेवर 07-02 गोलने विजय मिळविला अंतिम सामन्यात एम जे महाविद्यालय जळगांव विरुद्ध झाला यात 08-04 ने एम जे महाविद्यालय विजयी होऊन भोळे महाविद्यालय उपविजयी राहिले ल या स्पर्धेत पगारे साहिल संघरत्न, ठाकूर यशवंत, रवी गायकवाड, राहुल भोई, स्वप्नील तायडे,लोकेश सपकाळे, रोहित मोरे, आदर्श तुरकेले, दिग्विजय दाभाडे, इकबाल सिकलकर, धीरज परदेशी, चेतन केरहाळे,
यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विजय संपादन केला यश संपादन केल्यामुळे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी खेळाडूचा सत्कार केला यावेळी प्रा डॉ संजय डी चौधरी, प्रा अनिल सावळे उपस्थित होते
प्रा डॉ भारती बेंडाळे, प्रा एस डी चौधरी, प्रा डॉ जगदिश चव्हाण वरील खेळाडू प्राचार्य, क्रीडा समिती सदस्य, प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. सदर खेळाडूंना महेश शिरतुरे, पवन पारधे व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा डॉ संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले .



