भुसावळ – येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,भुसावळ शाळेतील 1 ते 8 वीच्या विदयार्थ्यांची दिनांक: 10/12/201रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्यांना सर्दी व खोकला ची सौम्य लक्षणे दिसून आल्याने त्यांनी दोन ने चार दिवस शाळेत येवू नये. अशा सुचना देण्यात आल्या आणि त्यांना पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शासनाच्या लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर प्रत्येक भागात सुरु आहे. तसेच शालेय परिसरातील नागरिकांना लसीकरण जनजागृती करण्यासाठी शाळेतील दोन शिक्षकांची नेमणूक करून शालेय आवारात त्या लसीकरण संदर्भात कॅम्पचे आयोजन दि. /9/12/21 ते 11/12/21 पर्यंत करण्यात आले. यासाठी आरोग्य विभाग, खडकारोड दवाखानातील कर्मचारी यांनी सहकार्य लाभले. या माहिमेसाठी शाळेच्या मुख्याधिपिका सुनंदा खरे यांच्या मार्गदर्शनली दोन शिक्षकांनी घरोघरी साधून जनजागृती केली.याप्रसंगी अध्यक्ष जयंतीलाल सुराणा सचिव सुरेश शर्मा उपाध्यक्ष अक्षय सराफ अशांची उपस्थिती होती.



