भुसावळ- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त भुसावळ येथे जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लब तर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रवादी कबड्डी चषकाचे आयोजन १५ व १६ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आलेले आहे.
भुसावळ शहरातील नवसाचा गणपती पटांगण, संतोषीमाता हॉल जवळ ,सुरभि नगर येथेजळगांव जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने जिल्हा निवड चाचणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून दि १५ रोजी सायंकाळी ४:००वाजता माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे राहणार आहेत, तसेच ध्वजारोहण नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते , क्रीडांगण पूजन उद्योजक राधेश्याम लाहोटी यांच्या हस्ते होणार आहे. तर नाणेफेक उद्योजक राजेश राका व जिल्हा कबड्डी असो चे सरकार्यवाह नितीन बरडे यांच्या हस्ते होणार आहे.
दोन दिवसीय दिवस-रात्री होणाऱ्या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारोह दि.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वा. राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगांव जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचे हस्ते होणार आहे. अंतिम सामन्याचे नाणेफेक माजी पालकमंत्री सतिष अण्णा पाटील यांचे हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी आ.संतोष चौधरी, माजी आ.मनिषदादा जैन , पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष श्याम कोगटा हे उपस्थित राहणार आहेत. तसेच दोन्ही दिवस जिल्ह्यातील निमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिसरातील विविध मंडळांचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. सर्व क्रीडा प्रेमींनी स्पर्धांचा लाभ घ्यावा व उपस्थिती द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष , जय गणेश फाऊंडेशन चे संस्थापक उमेश नेमाडे, जय गणेश फाऊंडेशन चे अध्यक्ष धीरज धांडे, सचिव तुषार झांबरे, स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष निलेश कोलते, कार्याध्यक्ष चैत्रामअप्पा पवार यांनी केले आहे.




