भुसावळ : भुसावळ तालुक्याचे लाडके आमदार संजय सावकारे यांचा शनिवार, 11 रोजी वाढदिवस असल्याने शहर व तालुक्यात दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील हतनूर येथे शनिवारी दुपारी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातील निधीनुसार लावण्यात आलेल्या आरओ प्लॅण्टचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तसेच हतनूर येथे अंत्योदय योजनेंतर्गत दिव्यांग बांधवांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमास भुसावळ पंचायत समिती सभापती वंदना उन्हाळे, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, सरपंच परीषदेचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, प्रशांत निकम आदींची उपस्थिती होती. भुसावळ तालुका दिव्यांग मित्र मंडळाचे अध्यक्ष शामसिंग राजपूत, कार्याध्यक्ष देविदास चौधरी आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान, या कार्यक्रमास हतनूर सरपंच सुवर्णा सपकाळे, उपसरपंच खंडू लालू सुरवाडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन इंगळे, पुंडलिक पाटील, विकास चौधरी, आनंदा पाटील, किरण चोपडे आदींची उपस्थिती होती.

भुसावळ तालुक्यातील ग्रामीणमध्ये विविध उपक्रम
तळवेल येथे आमदारांच्या हस्ते सभामंडळपाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच कोविड कॅम्पला त्यांनी भेट दिली तसेच आचेगाव येथे आमदार निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच साकरी येथे ई श्रम कार्ड नोंदणी शिबिरा व कोविड लस कॅम्पला आमदारांनी भेट दिली.


