संपूर्ण जगात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे खळबळ उडाली आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हेरिएंटबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तरूणांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे –
कोरोनाचे जेवढे व्हेरिएंट आले आहेत त्यांची मुलांवर खुप हलकी किंवा अजिबात लक्षणे दिसून आली नव्हती. एक्सपर्टनुसार, सध्या हे सांगता येऊ शकत नाही की ओमिक्रॉन किती गंभीर असेल, परंतु याच्या लक्षणांवर खुप लक्ष देण्याची गरज आहे. कारण वेळीच उपचार करता येऊ शकतात.
दक्षिण अफ्रीकेच्या डॉक्टरांनुसार, ओमिक्रॉनची लक्षणे प्रत्येकात वेगवेगळी असू शकतात, परंतु तरूणांमध्ये जास्त थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी याची लक्षणे आहेत. डेल्टा प्रमाणे या व्हेरिएंटमध्ये लोकांना चव आणि वास जाण्याचे जानवत नाही. मात्र, काही लोकांच्या घशात खुप जास्त खवखव जाणवत आहे.
लहान मुलांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका –
दक्षिण अफ्रीकामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या मुलांची संख्या जास्त आहे. त्यांच्यात हलकी ते गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. येथील ख्रिस हानी बरगवनाथ अकॅडमिक हॉस्पिटलच्या डॉक्टर रूडो मथिवा यांनी द सन ला सांगितले, आता येथे जी मुले येत आहेत. त्यांच्यात मध्यम ते गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. त्यांना ऑक्सीजन, सपोर्टिव्ह थेरेपी आणि जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता पडत आहे. ते पहिल्यापेक्षा जास्त आजारी पडत आहेत.
लहान मुलांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे –
- जास्त ताप
- सतत खोकला येणे
- थकवा
- डोकेदुखी
- घशात खवखव
- भूक न लागणे.


