भुसावळ : रेल्वेतील पीओएच कर्मचारी हेमंत भिरूड यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारस कुटुंबियांना सीआरएमएसतर्फे एक लाखांचा धनादेश देण्यात आला. शनिवार रोजी सीआरएमएस कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात हा धनादेश भिरूड यांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात आला. यावेळी मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया, मंडळ सचिव एस.बी.पाटील, मंडळ संघटक एस.के.दुबे, कारखाना मंडळ सचिव किशोर कोलते आदींच्या हस्ते धनादेश मयत कर्मचारी हेमंत भिरूड यांच्या कुटुंबियातील सदस्यांना देण्यात आला. याप्रसंगी अमरसिंग राजपूत, एस.एस.चौधरी, अयुब खान, एन.पी.पवार, अलका चौधरी, कुंदलता भूल, किरण बढे, ईश्वर बाविस्कर, अजित आमोदकर, विकास सोनवणे, हरीचंद सरोदे, दीपक खराटे, चंद्रकांत चौधरी, सुरेंद्र गांधीले, राजेश सोनी, प्रमोद बाविस्कर, तनजू धांडे, ताराचंद्र बर्हाटे, स्वप्नील पाटील, ललित पाटील आदींची उपस्थिती होती.



