चैतन्य भूमीच्या नामांतरासाठी जाणाऱ्या आंदोलकांना अटक संविधान आर्मीच्या कार्यकर्त्याची पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी :

भुसावळ – येथील संविधान आर्मीचे कार्यकर्ते दादर येथील चैत्यभूमीच्या नामांतरासाठी मुंबई येथे आंदोलनासाठी जात असतांना आज ५ रोजी संविधान आर्मी व विविध १० संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तसेच संविधान आर्मीच्या संविधान रक्षक सैनिकांसह भिमसैनिकांना आज मुंबई येथील दादर चैत्यभूमीच्या नामांतरासाठी गांड्याचा ताफा घेऊन जात होते.

यादरम्यान पोलिसांनी अडविल्यानंतर रस्त्यावर ठिया आंदोलन केले. दादर रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या संविधान आर्मीच्या रेल रोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असतांना कामगार नेते, संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या एका हातात तिरंगा व एका हातात संविधान घेऊन तसेच नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेवून मुंबईकडे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या भिमसैनिक आंदोलनकत्र्यांना पोलिसांनी शहरातील गांधी पुतळ्याजवळ पोलिस प्रशासनाने कार्यकर्त्याना रोखून अटक केली.
यावेळी कामगार नेते जगन सोनवणे यांना अटक करण्यात आली. संविधानाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. हा आंदोलनाचा हक्क शेतकरी, कामगार, दलित, बहुजनांचा असून संविधान बांधवांचा आवाज आता मोदी सरकारला दाबता येणार नाही. तसेच ७० वर्षे झालीत संविधान निर्मात्याचे नाव दादरच्या चैत्य भूमीला देण्यास मोदी सरकार का विरोध करीत आहे. हे सरकारने स्पष्ट करावे, असेही जगन सोनवणे यावेळी म्हणाले. आंदोलकांना पोलिसांनी अटक करून दडपशाही व मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीचे नाव बदलत आहे. मग दादर रेल्वे स्टेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव देण्यास काय हरकत असे नगरसेविका पुष्पा सोनवणे यांनी सांगितले. या अटकेचा यावेळी निषेध करून जोरदार घोषणाबाजी केली. अटक केलेल्या आंदोलकांवर कारवाई करून सोडण्यात
आले.
यावेळी आंदोलनात संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे, नगरसेविका पुष्पा सोनवणे, प्रदेशाध्यक्ष राकेश बग्गन, हरिष सुरवाडे, आरिफ शेख, संगिता मोरे, धनराज गोळे, ईरफान शेख, विशाल पवार, जयराज पुरभी, रमजान तडवी, चेतन सुरवाडे, रोहीत तायडे, अजय तायडे, मिलिंद भालेराव, विजय धुनदाळे, प्यारेलाल यादव, मुकेश वाकोडे, जावेद खाटीक, गोपी साळी, चंदू पहिलवान आदी सहभागी होते.