भुसावळ – शहरातील मुस्लिम कॉलनी भागातील खडका रोडवरील एक जण घरात प्राणघातक शस्त्र बाळगत असतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
मुस्लिम कॉलनी भागातील खडका रोडवरील एक जण घरात प्राणघातक शस्त्र बाळगत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यावरुन शनिवार रोजी रात्री पोलिसांनी तपासणी केली असता एकाचे घरात शस्त्र मिळून आल्याने पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी प्रशांत निळकंठ सोनार नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ४/१२/२०२१ रोजी रात्री ३:१० वाजेच्या सुमारास आरोपी शेख अब्दुल शेख कलिम राहणार खडका रोड मुस्लिम कॉलनी यांच्या राहत्या घराची तपासणी केली .
तपासणीत एक लोखंडी तलवार प्राणघातक हत्यारानिशी मिळून आले म्हणून गुरनं ४७३/२०२१ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४/२५ प्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ .विजय नेरकर करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गजानन पडघन, सपोनि गणेश धुमाळ,पोना रमण सुरळकर,निलेश चौधरी,गणेश चौधरी,परेश बिऱ्हाडे,करतार सिंग परदेशी,प्रशांत परदेशी, वैशाली सोनवणे अशांनी मिळून केली.




