भुसावळात घरफोडीचा प्रयत्न करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात :


भुसावळ – घरफोडी व दरोडा सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने
शहरातील बस स्थानक मधील रसवंतीच्या आडोशाला रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत लपलेल्या एका एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोकॉ.प्रशांत निळकंठ सोनार
बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार दिनांक ४/१२/२०२१ रोजी रात्री १२ :३० वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील बस स्थानक मधील नवनाथ रसवंतीच्या बाजूला आरोपी हसन अली नियाज अली हा सूर्यास्तानंतर व सूर्यास्तपूर्वी अंधाराचा फायदा घेत आपले अस्तित्व लपविण्याच्या उद्देशाने घरफोडी व दरोडे सारखे गुन्हे करतांना मिळून आला म्हणून गुरनं ४७२/२०२१ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२(ड) प्रमाणे उपविभगिय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या आदेशावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक तुषार केशव पाटील करीत आहेत.