भुसावळ व नशिराबाद मध्ये मध्यरात्री पोलीसांनी केले सर्च ऑपरेशन:

भुसावळ – शहरातील वाढते गुन्हेगार व गुन्हेगारी लक्षात घेता त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची करडी नजर असून याअन्तर्गत धड़क कारवाई मोहिम सुरु आहे . याअंतर्गत शहरासह परिसरातील नशिराबाद येथे शनिवार दि.04/12/2021 रोजी रात्री 8 ते आज पहाटे 3 या वेळेत सर्च ऑपरेशन व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.
यात वाँटेड गुन्हेगार अटक करणे, माननीय न्यायालयाने काढलेले वारंट समन्स आदीची बजावणी करणे,अवैध धंद्याची माहिती माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, ते सध्या काय करतात? गुन्हेगारी पासून दूर आहे किंवा कसे याबाबत खातरजमा करणे आदी उद्देशाने सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.
या मोहीमे दरम्यान पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.यात एनबीडब्ल्यू वाॅरंट बजावनी – 9, बीडब्ल्यू वाॅरंट बजावनी -11 समन्स बजावनी -67 पाहीजे आरोपी 27 चेक केले,3 मिळुन आले.अटक करण्यात आले आहे.महाराष्ट्र पोलीस कायदा 122 प्रमाणे 2 गुन्हे दाखल. 3 आरोपी अटक. 4/25 हत्यार कायदा -1 गुन्हा दाखल नाकाबंदी दरम्यान 21 विना नंबर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. 7 वाहने पडताळणी साठी डिटेन केली आहेत.तडीपार , 11 चेक केले. मिळून आले नाही.प्रोव्ही केसेस 5 गुन्हे दाखल जुगार , 1 गुन्हा दाखल त्याशिवाय उपविभागातील सर्व हिस्ट्री सिटर चेक करण्यात आले.

सदरच्या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक इंगळे भुसावळ शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक पडघन, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सपोनी अमोल पवार , भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, नशिराबाद पोलीस स्टेशन व पोलीस स्टेशन मधील डीबी पथक कर्मचारी सहभागी झाले होते.