भूसावळ मंडळ रेल प्रबंधक कार्यालयात सविधान दिवस साजरा ;


भुुसावळ – मध्य रेल्वे मंडळ रेल प्रबंधक कार्यालय येथे दिनांक 26 नोव्हेंम्बर 2021 ला सविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक . एन डी गांगुडे, वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी यांनी केले. या प्रसंगी मंडळ रेल प्रबंधक एस एस केडीया यांनी भारतीय सविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले आणि त्यांच्या मागे सर्व उपस्थितानी सामुदायिक वाचन केले.

या कार्यक्रमास अपर मंडल रेल प्रबंधक . नविन पाटील व श्री रुकमैया मीना, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी श्री. एन डी गांगुडे, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेत उपस्थित होते. उद्देशिकेचे वाचन करीत असताना कोरोना साठी दिलेल्या नियम व दिशा निर्देश चे पालन करण्यात आले.