भुसावळात मैत्री सागर बुद्ध विहार येथे संविधान दिवस साजरा :


भुसावळ – येथील मैत्री सागर बुद्ध विहार शिवाजी नगर येथे सवित्री बाई फुले अभ्यासिका येथील लहान मुलांना वही पेन व चॉकलेट्स देवून 26 /11 हा संविधान दिवस साजरा करण्यात आला .
प्रारंभी येथील महिला मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ संगीता भामरे यांचे हस्ते संविधान पूजन व प्रास्ताविक वाचन करण्यात आले . यानिमित्त उपस्थित सर्व मुला मुलींना सौ संगीता भामरे याचेतर्फे खाऊ वाटप करण्यात आला .
यावेळी स्कैन अभ्यासीकेचे प्रमोद नीळे, सौ दीप्ती नीळे , आशा , पुष्पा , आरती व शिवाजी नगरचे सामाजिक कार्यकर्ता अकबर गवळी, यांचेसह परिसरातील लहान मुले , मोठ्या संख्येने उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांचे व मुलांचे स्वागत श्री नीळे यांनी केले.
यावेळी सौ भामरे , अकबर गवळी , यांनी संविधान व संविधान बाबत थोडक्यात महत्व व माहिती विषद केली . मुलांनी गाणी सादर करीत आनंद व्यक्त केला व कार्यक्रमची सांगता झाली . ,