भुसावळ – गावठी कट्ट ताब्यात बाळगून रात्री आंधरात फिरणारा मुख्य आरोपी रात्र गस्त पथकाने रात्री केलेल्या गस्त दरम्यान ताब्यात घेतला .
येथील मुस्लिम कॉलनी जवळील हिरा हॉल शेजारी सार्वजनिक जागेवर एक इसम बनावटी गावठी कट्टा बाळगत असल्याची गोपनीय माहीती रात्रिची गस्त पोलिस पथकाला मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पथक तयार करून घटनास्थळी रवाना करून सापळा रचून गावठी कट्ट्यासह आरोपीस ताब्यात घेतले.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी सहाय्यक फौजदार शरीफ काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 18.11.2021 रोजी रात्री 1 वाजेचे सुमारास भुसावळ शहरात हिरा हॉल जवळ एक इसम हा गावठी कट्टा कंबरेला लावून फिरत आहे अशी बातमी सहाय्यक फौजदार शरीफ काझी यांना मिळाली . त्यानुसार त्यांनी लागलीच पोलिस निरीक्षक भागवत यांना सदर वृत्त कळविल्यावरून पोलीस निरिक्षक यांनी रात्र गस्त कर्मचाऱ्याचे पथक तयार केले . या पथकाने हिरा हॉल समोर लाईटचे उजेडात मुस्लिम कॉलनी कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कडेला लाईटच्या उजेडात उभा असलेला संशयीत आरोपी रोहन पितांबर पाटील (वय 23 ) राहणार गजानन महाराज मंदिर जवळ , कंडारी, भुसावळ यास अटक केले असता त्याचे जवळुन 15000/- रुपये कि.चा एक गावठी कट्टा ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे , बाजारपेठ पो. नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस उप.निरिक्षक महेश घायतल, सहाय्यक फौजदार तस्लीम पठाण सहाय्यक फौजदार शरिफोद्दिन काझी , पो.हे.कॉ.मिलिंद कंक, सत्तार शेख ,पो.ना.दिपक कापडणे पो.कॉ योगेश माळी,प्रणय पवार अशांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास परी.पो.उप.नि.महेश घायतड करीत आहे.


