भुसावळ : अमोघ वक्तृत्व, एक घाव दोन तुकडे करण्याचा स्वभाव आणि बिनधास्त आक्रमक व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य केले होते. आज ते आपल्यात नाहीत; पण लक्षावधी चाहत्यांच्या मनात मात्र ते अजूनही घर करून आहेत, अशी भावना शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी व्यक्त केली. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील अष्टभुजा देवी मंदिराजवळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत हाते. शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

राजकारणात बाळासाहेब किंगमेकर : संजय सावकारे
महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही नवीन घडले की, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण निघतेच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर! असा प्रश्नही हमखास चर्चेच्या ओघानेच येतो. बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक हिंदुत्व मान्य नसलेले त्यांचे विरोधकही बाळासाहेब आज असायला हवे होते, असे चटकन बोलून जातात. महाराष्ट्राच्या राजकारणावर गप्पांचा फड रंगला आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण निघाली नाही असे होतच नाही, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.
बाळासाहेबांच्या पाठिंब्यामुळे मराठी माणस पुढे गेला : सुनील नेवे
मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी स्थापन झालेली शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नेतृत्व गुणांवर आणि असामान्य संघटन कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचवली. बाळासाहेबांच्या पाठिंब्यामुळे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती आणि सुप्रिया सुळे खासदार कश्या झाल्यात या आठवणींचा उजाळा प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी दिला. प्रत्येक समाजाला केंद्रबिंदू मानून राजकारणात योग्य ठिकाणी स्थान देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. छोट्या छोट्या समाजावर जबाबदार्या देऊन त्यांना आपलेसे त्यांनी केले, असे संतोष बारसे म्हणाले.
सर्व पक्षीयांतर्फे अभिवादन
आमदार संजय सावकारे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, माजी नगराध्यक्ष निळकंठ फालक, माजी प्रभारी नगराध्यक्ष सोनी बारसे, संतोष बारसे, नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनावणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, पुरुषोत्तम नारखेडे, मुकेश पाटील, अमोल इंगळे, गिरीश महाजन, पप्पू बारसे, नरेंद्र लोखंडे, निर्मल दायमा, कैलास लोखंडे, हरीश फालक, नितीन धांडे, सोनी ठाकूर, राकेश खरारे, देवेंद्र पाटील, सुमित बर्हाटे, पवन नाले, धनराज ठाकूर, हप्पीसेठ, शरद जोहरे, शरद जयस्वाल, गोकुळ बाविस्कर, बापू महाजन, संतोष माळी, दिनेश बुंदेले, अमोल पाटील यांनी अभिवादन केले.


