तालुका विधी सेवा प्राधिकरण व भुसावळ वकिल संघातर्फे आयोजित कायदे विषयक शिबीराचा समारोप ;


भुसावळ – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पॅन इंडिया अवेरनेस ॲन्ड आऊटरिच या उपक्रमांतर्गत कायदे विषयक माहितीपर शिबिरांचे आयोजन भूसावळ तालुक्यात करण्यात आले.

तालुका विधी सेवा प्राधिकरण व भुसावळ वकील संघ यांच्या वतीने तालुक्यात 2 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत विविध ठिकाणी वेगवेगळया विषयांवर कायदे विषयक शिबिरे आयोजित करण्यात आली यात तालुक्यातील शाळा, संस्था,बचत गट ,संघटन ग्रामपंचायत याठिकाणी वकिल ,विधी विद्यार्थी, पॅरालिगल व्हॉलिटींयर यांनी जावून कायदे व शासनांच्या योजना याविषयी माहिती दिली व जनजागृती केली 14 तारखेला पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती म्हणजे बालदिनी या उपक्रमाचा समारोप कोर्टापासून पंचायत समिती पर्यंत रॅली काढण्यात आली तसेच पंचायत समिती हॉलमध्ये मा. श्री.एस्.पी डोरले साहेब व इतर मान्यवर न्यायाधीश वृंद यांनी नेहरूजींच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. एस.पी डोरले साहेब यांनी बालदिनाविषयी मार्गदर्शन केले. या निमित्ताने ज्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले असे वकील मंडळी ,विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, पॅरालिगल व्हॅलेटीयर व वक्ते म्हणून लाभलेले इतर मान्यवर यांना गौरवपत्र देवून गौरविण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्यायाधीश एस्.पी डोरले यांनी भुषविले तसेच सदर कार्यक्रमास श्री.एम.पी बिहारे सह.दिवाणी न्यायाधीश व.स्तर , श्री.अहीर दुसरे सहदिवाणी न्यायाधीश व.स्तर ,श्रीमती डी एम शिंदे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर, द.भा.डोमाळे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर तसेच भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष ॲड तुषार पाटील उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. कैजर भारमल यांनी केले व सांगता तुषार वानखेडे यांनी आभार प्रदर्शन करून केली यावेळी काही सन्मानार्थिनीं आयोजित शिबिरांविषयी मनोगत व्यक्त केले . ही शिबिरे आयोजनासाठी ॲड जास्वंदी भंडारी, ॲड. निलेश भंडारी ,एस.आर.पाटील , जगदीश मानकर पी.एल. व्ही.वकील मंडळी यांनी सहकार्य केले