वरणगाव – येथे बस स्टँड चौकात हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. प्रसंगी वरणगाव शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी बाळासाहेबांविषयी आपल्या मनोगतात बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण शिवसेना करत आहे व आज बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचे पुत्र माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचा कारभार गेल्या दोन वर्षापासून योग्यप्रकारे सांभाळत असून महाराष्ट्र राज्य व येथील शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक समाजकार्यात अग्रेसर आहेत समाज सेवा शिवसेना व पदाधिकारी तसेच शिवसैनिक करत आहेच हीच खरी आज बाळासाहेबांना समाजसेवेच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करीत आहोत प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक विलास मुळे राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष श्री सुनील काळे उपजिल्हा संघटक अल्पसंख्यांक सईद मुल्लाजी मुस्लिम समाजाचे नेते हीप्पीभाई शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे माजी नगरसेविका श्रीमती शशी कोलते भाजपाचे शहराध्यक्ष सुनील माळी राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष अश्फाक काजी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे वाय आर पाटील सर उपतालुकाप्रमुख पप्पू सोनवणे श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री बाळकृष्ण धनगर के बी काजी निलेश ठाकूर सागर वंजारी संजय वंजारी गजानन वंजारी गोलू राणे संदीप माळी पिंटू धोबी पवन चौधरी तुषार निंबाळकर राहुल बावणे महेंद्र शर्मा सुपडू धनगर अतुल शेटे राम शेटे सुनील भोई कृष्णा पाटील अमर सोनार संतोष माळी रवी पाटील किरण माळी ज्येष्ठ शिवसैनिक अशोक भाऊ कोळी मानपुर सुभाष झोपे भैया देशमुख बंडू जंगले उमाकांत झांबरे राजू चौधरी उर्फ मट्टी शैलेश सोनवणे तुषार जोशी महेश सोनवणे चेतन सराफ अब्बू खां रोहित मुळे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते


