वरणगाव येथील नगर परिषदेच प्राप्त झालेल्या अग्निशमन बंब संदर्भात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केलेल्या सर्व वल्गना खोट्या – शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन


वरणगाव – येथील नगरपरिषदेस काल दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना उपनेते नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते अग्निशमन बंबाचे उद्घाटन करून तो नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आला . त्यानंतर वरणगाव चे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी एका चॅनलच्या माध्यमातून जनतेला जी माहिती दिली ती संपूर्णतः खोटी असून सत्य माहिती पुढीलप्रमाणे आहे त्याचे पुरावे देखील सदर प्रसिद्धीपत्रका सोबत देत आहे सदर बाबतीत सदर अग्निशामन बंबाची मागणी 18 जानेवारी 2015 रोजी तत्कालीन नगराध्यक्ष सौ अरूणाबाई इंगळे यांच्या अध्यक्षतेत सर्वसाधारण सभेत बंबाची मागणी करण्यात आली होती त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना सदर ठरावावर कुठलीच कार्यवाही झाली नाही त्यानंतर नामदार गुलाबराव पाटील पालक मंत्री झाल्यानंतर 26 मार्च 2020 रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांनी पालकमंत्री यांच्या आदेशानुसार सदर कामास प्रशासकीय मंजुरी दिली 2 डिसेंबर 2020 रोजी नगरपरिषदेने निवेदने साठी नोटीस प्रसिद्ध केली 8 डिसेंबर 2020 रोजी दिव्य मराठी या दैनिकात निविदा सूचना प्रसिद्ध झाली महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध झाली निविदा मंजुरी दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी नगर परिषद सभा ठराव क्रमांक 1 ने करण्यात आली
पुढील प्रक्रियेत करारनामा 14 जानेवारी 2021 रोजी करण्यात आला हा 15 जानेवारी 2021 रोजी सदर कामाची निविदा देण्यात आली सदरचा संपूर्ण कालावधी हा प्रशासकीय मान्यतेपासून ते अग्नीशमन बंब चे लोकार्पण करण्यापर्यंतचा हा महा विकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील असून त्यासाठी पालक मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांनी जनतेचे हित लक्षात घेता निधी उपलब्ध करून देऊन अग्नीशमन बंब व नगर परिषदेच्या ताब्यात दिलेला आहे सदर बाबतीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती साफ खोटी व चुकीची असून दिशाभूल करणारी आहे तरी माझे सामान्य वरणगावकर जनतेस विनंती की सत्यता पडताळून पाहावी सदरची संपूर्ण प्रक्रियाही वरणगाव नगरपरिषदेत प्रशासकीय काळात झालेली आहे या प्रक्रियेत माजी नगराध्यक्ष श्री सुनील काळे यांचा कुठेच संबंध नाही अशाच बाबतीत पंचवीस कोटी रुपयांच्या पाणी योजनेला देखील माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यावेळेसही श्री सुनील काळे यांनी माननीय राज्यपाल व इतर नेत्यांची नावे घेऊन खोटे निवेदन केले होते ही त्यांची नेहमीची सवय आहे वरणगावकर जनता सुशिक्षित व जाणकार आहे तरीसुद्धा सत्य जनतेसमोर यावे म्हणून हे प्रसिद्धी पत्रक आम्ही देत आहोत प्रसंगी पत्रकार परिषदेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक श्री विलास मुळे उपतालुका प्रमुख श्री सुभाष चौधरी उपजिल्हा संघटक अल्पसंख्यांक सईद मुल्लाजी पंचायत समिती सदस्य श्री विजय सुरवाडे मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हीप्पी सेट निलेश ठाकूर सागर वंजारी आजार शेख भूषण बाविस्कर उपस्थित होते