भुसावळ – तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळां मधील शिक्षक विविध उपक्रम राबवून ज्ञानरचनावादी शिक्षणावर भर देत असतात यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे यामध्ये अधिक भर घालत जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधा वाढवण्यासाठी त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी लोकसहभाग शासनस्तरावरून प्रयत्न करून सुसज्ज व आधुनिकतेकडे शाळांचे रूप बदलवण्याचा प्रयत्न असणार आहे यासाठी शिक्षक मुख्याध्यापक संघटनांची मदत घेऊन जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात तालुक्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भुसावळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नूतन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले

गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा गौरव समारंभ भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने गटसाधन केंद्रातील सभागृहात करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते डी पी साळुंखे होते यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जे पी सपकाळे, शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस एस अहिरे, इबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर आर धनगर, रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष डॉ संजीव भटकर, विज्ञान अध्यापक मंडळाचे सुनिल वानखेडे, क्रीडा संघटनेचे डॉ प्रदीप साखरे, भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष अनिल जगताप, सचिव नितीन भालेराव, सदस्य नितीन किरंगे, सुरेखा पाटील, शेख इरफान शेख युसुफ, सय्यद नवीद अखतर, सुनील पाठक आदी उपस्थित होते
अध्यक्षीय भाषणात डी पी साळुंखे म्हणाले की प्रशासन व शाळा दोघांच्या समन्वयाने शालेय गुणवत्ता वाढीसाठी मदत होते तसेच येणाऱ्या अडचणींवरती तात्काळ मार्ग निघून काम सोयीस्कर होत असल्याने असल्याने भविष्यात एकत्रित काम करण्यावर भर देणार असे सांगितले
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार नितीन भालेराव यांनी केले
यांनी केले मनोगत व्यक्त-
जे पी सपकाळे एस एस अहिरे आर आर धनगर डॉ संजीव भटकर सुनिल वानखेडे डॉ प्रदीप साखरे अनिल जगताप नितीन भालेराव नितीन किरंगे सुरेखा पाटील शेख इरफान शेख युसुफ, सय्यद नवीद अखतर सुनील पाठक यांनी मनोगत व्यक्त-केले


