वरणगाव:-
मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे त्याचसोबत दात महत्त्वाचे आहेत दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण डोळ्यांची व दातांची निगा काळजी घेत नाही यामुळे विविध प्रकारच्या व्याधी होऊ शकतात याकरिता डोळ्यांची निगा राखणे गरजेचे आहे थंड पाण्याने दररोज डोळे धुतले पाहिजेत धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे अथवा डोळ्यांमध्ये धूळ जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे यामुळे भविष्यात आपल्या डोळ्यांची दृष्टी कायम राहून विना चष्मा दूरचे अथवा अथवा जवळचे बघू शकतो याकरिता डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नेत्ररोग तज्ञ डॉक्टर महेंद्र चौधरी यांनी केले.
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ जळगाव यांचे मार्फत मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर भुसावळ येथे यश हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले त्यासाठी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर महेंद्र चौधरी आणि दंत चिकित्सक डॉक्टर लीना चौधरी यांनी आलेल्या सर्व रुग्णांचे नेत्र आणि दंत तपासणी केली. त्यावेळेस शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉक्टर महेंद्र चौधरी पुढे म्हणाले की सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघाचा हा मोफत नेत्र व दत तपासणीचा शिबिराचा अनोखा उपक्रम अनोखा आणि समाजाला मार्गदर्शक ठरणार आहे.
या मोफत नेत्र व दात तपासणी शिबिरासाठी जिल्ह्यातील 129 शिक्षकांनी त्यांच्या कुटुंबीयांसह या मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचा फायदा घेतला. या शिबिराच्या वेळेस सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. शिबिरात शिबिरात ज्या शिक्षकांना डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची गरज होती त्यांना त्यांच्या शस्त्रक्रियेच्या रक्कम मध्ये एकूण 30 टक्के सूट मिळेल असे डॉक्टरांनी सांगितले. नाना पाटिल सर या उपक्रमासाठी अडूलसा रोप भेट दिले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी महासंघाचे अध्यक्ष प्रसन्ना बोरोले, सचिव विक्रांत चौधरी, विनय भोगे, योगेश इंगळे , कुंदन वायकोळे, गिरीश महाजन,हेमंत धांडे, मिलिंद पाटिल,संजु भटकर,हरीश बोंडे, विजय कोल्हे,अजय फेगडे,धनराज नेहते, प्रदीप सोनवणे,दीपक टोके, तुषार भोळे,तेजेंद्र महाजन,कैलास तायड़े,नीलेश पाटिल,समाधान जाधव,नाना पाटिल,अमित चौधरी, राकेश कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, भाग्यश्री बोरोले,रुपाली भोळे,खुशाल महाजन,सुधीर तायड़े,विजय चौधरी,शीतल चौधरी,आनंदा सपकाळे ,नितिन राणे हे उपस्थित होते.उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश इंगळे यांनी केले.

नेहमीप्रमाणे सरदार पटेल जयंती ला पण समाज भिमुख कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकता हे जोपासली जावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये सुद्धा असेच कार्यक्रम लेवा शिक्षक महासंघ आयोजित करत राहील याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देऊ.
प्रसन्ना बोरोले
अध्यक्ष सरदार लेवा शिक्षक महासंघ


