रस्ते अपघातात मृत्यु झालेल्या भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याच्या कुटुंबियांना सीआरएमएसतर्फे मदतीचा धनादेश –

भुसावळ : रेल्वे इंजिनिअरींग विभागातील यार्डमधील कर्मचारी अल्ताफउद्दीन यांचे नुकतेच रस्ते अपघातात निधन झाले. कर्मचार्‍यांचा प्रत्येक एक लाख रुपयांचा अपघाती विमा सीआरएमएस संघटनेने काढल्याने रेल्वे कर्मचार्‍यांच्या वारस कुटुंबास मदतीचा धनादेश देण्यात आला.
यावेळी मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया, मंडल सचिव एस.बी.पाटील, मंडळ कोषाध्यक्ष एस.के.दुबे, मंडळ संघटक पी.के.रायकवार, झोनल वर्कशॉप सचिव किशोर कोलते, जनरल ब्राँचचे अध्यक्ष पी.के.गुप्ता, सचिव दीपक शर्मा, ललितकुमार सिंग, अ‍ॅडमिन शाखा सचिव उमाकांत बाऊस्कर, संजय तडवी, युनूस भाई, सुभान गवळी, किरण बढे, मुकेश यादव व कर्मचारी उपस्थित होते.