भुसावळ :-नेपाळला पोखरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नाहाटा महाविद्यालयातील तिन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून नेपाळमध्ये नेपाळचा पराभव केला, त्यांच्या कार्याची दखल घेत महाविद्यालयीन व्यवस्थाना तर्फे सन्मान करण्यात आले, तसेच क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेचे मोहन फालक यांनी केले.

शहरात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान नसताना देखील विपरीत परिस्थिती चेतन सोनवणे, भावेश कोळी, मनीष धांडे या खेळाडूंनी नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करून राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मजल मारत यशस्वी कामगिरी केली, या खेळाडूंचा नाहाटा महाविद्यालयाचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, प्राचार्या मीनाक्षी वायकोळे, प्रा. आनंद उपाध्याय यांनी एका छोट्याखाणी कार्यक्रमात सन्मान केला.
तसेच खेळाडूंना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन मोहन पालक यांनी य खेळाडूंना फिजिकल डायरेक्टर प्रा. आनंद उपाध्याय यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसंगी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, श्याम भारंबे, विद्यापीठ खेळाडू राहुल कोळी, राष्ट्रीय खेळाडू विकास पाटील उपस्थित होते.


