भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर अग्रवाल –


भुसावळ : शहरातील ऑटोमोबाईल व मसाले क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर अग्रवाल यांची भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन ही निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, रमाशंकर दुबे, रेखा पाटील, गणेश माळी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आगामी काळात भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांचे विविध समस्या मार्गी लावून जिल्ह्यातील उद्योग धंदे व रोजगार वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल यांनी सांगितले.