भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील महिलेचा विनयभंग;

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील एका विवाहीत महिलेचा तीच्या घरात घुसुन विनयभंग केल्याची घटना घडली

या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की दि २० बुधवार रोजी तालुक्यातील तळवेल येथील विवाहीत महिला आपल्या घरात दुपारच्या वेळेस घरात एकटी असल्याचे पाहुन शेजारीच राहणारा श्रीकृष्ण गोकुळ राणे हा महिलेच्या घरात अनधीकृत प्रवेश करीत माझ्याशी प्रेम संबंध ठेव असे म्हणुन त्याने लज्जा वाटेल असे कृत्य करू लागला तसेच तुला गावात राहु देणार नाही अशी धमकी दिल्याने
याबाबत पडिती महिलेच्या फिर्यादी वरून वरणगाव पोलीस स्टेशनला श्रीकृष्ण राणे विरोधात भा द वी कलम ३५४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मुकेश जाधव करीत आहे