महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे मुलांसाठी “मायेचा खाऊ” वाटप ; खडका येथील अंगणवाडीत उपक्रम ;

खडका – येथील अंगणवाडीत “सॅम” मुलांना पौष्टिक आहार वाटप व मातांना स्वछता, आहाराबाबत मार्गदर्शन अध्यक्ष आरती चौधरी यांनी केले. यावेळी मंडळाच्या लता होसकोटे, जयश्री ओक, स्वाती नाईक, प्राची राणे, वैशाली भगत, वीणा ठाकूर मंगला पाटील, प्रगती ओक, प्रमीला नेमाडे हजर होत्या
बालकांना पौष्टिक खाऊ देउन वजन वाढण्यास मदत व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम केला गेला. या मध्ये गूळ, शेंगदाणे , खजूर, केळी. व मास्क वाटप करण्यात आले व त्याच बरोबर लहान मुलांची स्वच्छता व काळजी कशी घ्यावी यासाठी आरती चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
पर्यवेक्षिका जयश्री जोशी व शोभा जाधव यांचे आयोजन होते तर सीडीपीओ रेखा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले
खडका-ईदगाह येथील सेविकां मदतनीस यांनी मदत केली.
वरील खडका भागातील कार्यक्रमात पालक व बालक उपस्थित होते. महिला क्रिडा मंडळाच्या जयश्री ओक व स्वाती नाईक यांनी ह्या कार्यक्रमासाठी मदत केली