भुसावळ -येथील सत्र न्यायाधीश 2 आर. एम. जाधव यांनी स्पेशल पोक्सो केस न. 8/2016 मध्ये आरोपी तौसुफुद्दीन फरिदुद्दीन वय 55 यास दोषी धरून आज दि. 20/10/2021 रोजी कैदेची व दंडाची शिक्षा सुनावली.
याकामी सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभयोक्ता विजय खडसे यांनी काम पाहिले. आरोपी हा भुसावळ येथे न. प. शाळेत प्राथमिक शिक्षक असून पिडीत 9 वर्षाच्या मुलीवर त्याने वेळोवेळी शाळेतील बाथरूम मध्ये नेत विनयभंग केला होता.
याबाबत पीडितेच्या आजोबा यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला भा. द. वी. कलम 354 A व पोस्को कायदा कलम 7 व 8 प्रमाणे फिर्याद दिली होती. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासले असुंन पिडीत मुलगी, फिर्यादी तसेच तपासाधिकारी आर. एम. वसत्कर यांची साक्ष महत्त्व पूर्ण ठरली. आरोपीस कलम 354 A प्रमाणे 1 वर्ष सक्त मजुरी व 5000 रु. दंड तसेच दंड न भरल्यास 1 महिना सक्त मजुरी आणि पोस्को ॲक्ट कलम 10 प्रमाणे 5 वर्ष सक्त मजुरी व 5000 रु. दंड, दंड न भरल्यास 1 महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी तर्फे अँड. सागर चित्रे, जळगाव यांनी तर पैरवी अधी. स. फौजदार समिना तडवी यांनी काम पाहिले.



