दीपनगरात वसुंधरा जायन्ट्स सहेली ग्रुप भुसावळ यांच्यातर्फे किशोरवयीन मुलींसाठी कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – कळी उमलतांना ‘ या पार्श्वभूमिवर किशोरवयीन मुलींसाठी वसुंधरा जायन्ट्स सहेली ग्रुप शाखा भुसावळ
प्रोजेक्ट चेअरमन श्रीमती निलिमा विलास पाटील सौ शोभा सतीश जंगले यांनी श्री शारदा माध्यमिक विद्यालय , दीपनगर . येथे शनिवार रोजी किशोरवयीन मुलींसाठी कार्यक्रम घेतला .
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी .डी. चौधरी सर होते. प्रमुख पाहुणे डॉ. निलिमा नेहेते आणि वसुंधरा जायंट्स ग्रुप भुसावळच्या अध्यक्षा सौ महानंदा पाटील होत्या . मान्यवरांचे स्वागत शाल व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
प्रसंगी मासिक पाळी व्यवस्थापन
या विषयावर डॉ. नीलिमा नेहेते यांनी विद्यार्थिनींना विस्तृत असे मोलाचे मार्गदर्शन केले हार्मोन्स चेंजेस बाबत त्यांनी
मार्गदर्शन केले. “गुड टच , बँड टच ” या विषयावर सौ वर्षा लोखंडे यांनी विद्यार्थिनींना स्पर्श कसे ओळखावे तसेच स्वसंरक्षणासाठी ‘स’ची “सप्तपदी” सांगितली तसेच ‘संरक्षणासाठीचे अस्त्रे’ याबाबत माहिती दिली. त्यानंतर विद्यालयाच्या सौ. मीना नेरकर यांनी सॅंनेटरी नॅपकिन’चा वापर आणि ते नष्ट कसे करावे व स्वच्छता कशी राखावी यावर मार्गदर्शन केले . तद्नंतर वसुंधरा जॉईंट सायली गृपच्या अध्यक्षा सौ.महानंदा पाटील यांनी योगा व मेडिटेशन याबाबत माहिती दिली व सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या निबंध , चित्रकला व कविता लेखन स्पर्धा यांचे आयोजन केले होते . स्पर्धेत नंबर आलेले व पथनाट्य सादर केलेल्या विद्यार्थ्यांना वसुंधरा जायन्ट्स सहेली ग्रुप , भुसावळच्या उपाध्यक्ष सौ.वर्षा लोखंडे यांनी त्यांचे सासरे व्ही.बी. लोखंडे यांच्या स्मरणार्थ बक्षीस वाटप केली
सर्व महिला शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत केली .
सर्व शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व सर्व जायन्ट्स वसुंधरा सहेली उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन श्रीमती निलिमा पाटील यांनी आणि
आभार प्रदर्शन सौ शोभा जंगले यांनी केले त्यानंतर शाळेतील पाचवीच्या विद्यार्थिनींचे कन्या पूजन करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच
वसुंधरा जॉईन सहेली ग्रुप भुसावळच्या सदस्य सौ सुरेखा राणे यांनी शिक्षिका व वसुंधरा सहेली यांना हळदी कुंकू देऊन भेटवस्तू दिल्या.