भुसावळ.- राधाकृष्ण प्रभात फेरी तर्फे बुधवारी पहाटे ६ वा शहरातील भद्रकाली अष्टभुजा मंदीर समोर माहिलांनी व पुरुषांनी गरभा सादर .करीत गरभावर ठेका धरुन गरभा सादर केला प्रसंगी राधा कृष्ण प्रभात फेरीच्या सदस्यांनी जल्लोष केला.
या वेळी सकाळी सहा वाजता शहरातील अष्टभुजा मंदीरापासून प्रभात फेरी काढून भक्तीगीत गात,घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली.पांडूरंग टॉकीज समोरील अग्रसेन चौक मार्ग प्रभात फेरी भद्रकाली अष्टभुजा मंदीरा समोर आली तेथे महिला व पुरुषांनी गरभा सादर केला.यावेळी राधेश्याम लोहाटी,संजू अग्रवाल,अर्जुन पटेल,लीलाधर अग्रवाल,डॉ. देवेंद्र शर्मा,जगदीश शर्मा,शाम काबरा,मोहन भराडे,डॉ.साधना शर्मा,अर्चना अग्रवाल,राज भराडे,भारती राठी,श्यामा लड्ढा, रसूला पटेल,सुनील लाहोटी, शाम अग्रवाल,गोपाल तिवारी, डॉ शुभांगी राठी,चंद्रकांत मंत्री,दीपक आगीवाल यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.



