विधी सेवा समिती तर्फे अहिल्यादेवी कन्या शाळेत कार्यक्रम :मुलींचे सक्षमीकरण व महिला कायदे याविषयी माहिती:

भुसावळ . पॅन इंडिया अवरनेस ॲन्ड आऊटरिच या कार्यक्रमाअंतर्गत विधी सेवा प्राधिकरण व भुसावळ वकील संघाच्या वतीने अहिल्यादेवी कन्या शाळेत मुलींना मार्गदर्शन करण्यात आले विधी सेवा प्राधिकरण तर्फे २ऑक्टोबर ते १४नोव्हेंबर कायदा व शासन योजनांची माहिती देण्याची मोहिम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या शाळेत मुलींचे सक्षमीकरण व महिला कायदे याविषयी माहिती देण्यात आली .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष ॲड तुषार पाटील, महिला प्रतिनिधी ॲड जास्वंदी भंडारी उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक संजिव पाटील हे होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्तेॲड.वैशाली चौधरी यांनी विविध कायद्याची माहिती उदाहरणांसह सोप्या भाषेत समजावून सांगितले व या किशोर वयात कोणत्याही भुलथापांना बळी न पडता करिअर कडे कसा लक्ष द्यायचे यावर विचार मांडले ॲड तुषार पाटील यांनी मुली वेळ आली तर कश्या चंडिका बनुशकतात हे सांगितले सोशल मीडिया मुळे मुलींची कशी फसवणूक होतव काय खबरदारी घ्यावी यावर ॲड जास्वंदी भंडारी यांनी भाष्य केले भारती म्हस्के यांनी ही मुलींशी संवाद साधला कार्यक्रमाचे अध्यक्ष संजिव पाटील गरज पडली तर मुली देवी प्रमाणे उग्र रुप धारण करु शकतात असे मनोगत व्यक्त केले

यावेळी शाळेसमोर रस्त्यावर विधी शाखेचे विद्यार्थी व वकील यांचेकडून पथनाट्य सादर करण्यात आले ॲड मनिषा बाविस्कर, ॲड विक्रम शेळके, ॲड रोहन सावंत प्रक्रिया अडकमोल,सुजाता वाघुळदे, प्रतिमा अग्रवाल, पुजा चौधरी, हेमांगी धांडे,विपश्यना सपकाळे यांनी पथनाट्य सादर केले.श्री.प्रशांत देवरे यांनी ढोलकी वर साथ दिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विनोद उबाळे यांनीकेले श्री.आशिष निरखे यांनी आभार व्यक्त केले मुख्याध्यापिका सौ.मानसी कुलकर्णी, श्री सोनू मांडे व शाळा कर्मचारी यांनी सहकार्य केले.