भूसावळ -वरणगावं येथील कै.वामन गुरुजी नगर येथील अंगणवाडी मध्ये व येथील विष्यवशांती बौद्ध विवाहर येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प, भुसावळ अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रेखा गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे, माजी नगरअध्यक्षा अरुणा इंगळे,माजी नगरसेविका माला मेंढे, पर्यवेक्षीका अनुपमा बोरीकर, व अंगणवाडी सेविका व मदतनीस क्रमांक , यांनी परिश्रम घेतले, यावेळी आशा कर्मचारी, याभागातील महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे पोषण अभियान वरणगावं यासंदर्भात सेल्फी पाईट सुद्धा लावण्यात आले होते.


