नवीन पाटील यांचा सत्कार ;

भुसावळ – येथे नवीन रुजू झालेले एडीआरएम नवीन पाटील यांचा रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळने भेट घेवून सत्कार केला व भुसावळ विभागातील कामगारांच्या समस्यावर चर्चा केली.
नवीन पाटील यांनी संबधित विभागीय अधिकाऱ्यानं बरोबर चर्चा करून समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले.यावेळेस रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा,राजेश लखोटे,प्रीतमकुमार टाक,कमलाकर बनाईत,अरविंद थोरात,सुरेंद्र यादव,डी डी पाटील,गोपाल उमाळे,अमन झनके उपस्थित होते.