रावेर –
सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्था,भुसावळ शाखा रावेर तर्फे वृंदावन धाम आदिवासी भिल्ल वस्तीत भगिनींना साडी, गहु, तांदुळ, साखर वाटप करण्यात आले,
सखी श्रावणी संस्था गेल्या वर्षा पासुन संस्था सदस्यांचे वाढदिवसा निमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असते, आज १५ सप्टें रावेर शाखा कार्याध्यक्षा श्रीमती कांताताई बोरा यांचे वाढदिवसा निमित्त आदिवासी भगिनींना साडी, किराणा व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला,
काहि दिवसांपुर्वी या आदिवासी वस्तिला सखींनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या, तर त्या ठिकाणी घरातील कर्त्या व्यक्ती ला हाताला काम नाही, रहायला घर ठिक नाहि, रस्ता नाहि, लाईट ची व्यवस्ता नाहि, काही महीन्यांन पुर्वि या वस्तितील एक १५ वर्षाची मुलगी व ८ वर्षा चा मुलगा सर्प दंशाने दगावले असे कळाले, तेव्हा रावेर शाखेचे अध्यक्षा शारदा चौधरी यांचे प्रयत्नांनी आठ दिवसाचे आत त्यांनी पथदिव्यांची व्यवस्था आदिवासी भिल्ल वस्तीत करून दीली,
संस्था नेहमी गरीब व वंचित असलेल्या समाज बांधव व भगिनींसाठी नेहमीच काम करत आहे, व सदैव करत राहील, आपण आपल्या अडचणी आमचे पर्यंत पोहचवा आम्हि सर्व सखी यथाशक्ती आपली नक्कीच मदत करु व आपले साठी धावुन येऊ संस्थापिका सौ.राजश्री नेवे यांनी व्यक्त केले, यावेळी उपस्थीत सखी वर्षा माहुरकर,माया चौधरी, मंदाकिनी केदारे,कांता बोरा, शारदा चौधरी, कल्पना पाटील, वर्षा पाटील, भाग्यश्री पाठक, प्रति महाजन, चंद्रकला इंगळे, रेखा जोशी, सुवर्णा भागवत, उज्वला सोनवणे, अलका वाणी,यांचेसह संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या.



