भुसावळ -शहरातील आंतरराष्ट्रीय धावपटू स्वर्गीय श्री आर बी भवार यांचे नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजलीपर विशेष दहा किलोमीटरच्या रनचे आयोजन भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे रविवारी करण्यात आले होते.
रविवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून ठीक सकाळी सहा वाजता शहरातील धावपटूंनी धावायला सुरुवात केली .आरपीडी रोड वरून झेङटीएसपर्यंत व तेथून पुन्हा मैदानावर परत असा रनचा मार्ग होता. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली.
त्यानंतर श्रद्धांजलीपर बोलताना भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख श्री प्रवीण फालक यांनी दिवंगत श्री भवार काका यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते या प्रसंगी म्हटले की भवार काका रेल्वेत नोकरीत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक रनिंग स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांनी धावायची दिनचर्या कायम ठेवली. वयाच्या 92 व्या वर्षापर्यंत शहरातील नागरिकांनी त्यांना धावताना पहिले आहे. त्यांच्यामुळे प्रेरित होऊन शहरातील असंख्य आबालवृद्ध नागरिकांनी धावायला सुरुवात केली. ते कायम अनवाणी धावत असत हे त्यांचे वैशिष्ट्य होय. शहरातीलच नव्हे तर रेल्वे, बस वा इतर माध्यमातून प्रवास करणारे नागरिक देखील भवार काकांना एकाकी सकाळी वयाच्या 90 मध्ये धावताना बघून आश्चर्यचकित होत असत असेही त्यांनी नमूद केले. इतके असूनही ते अतिशय साधे व उत्साही व्यक्तिमत्व होते व कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले. शहरात प्रथमच रन भुसावळ रन चे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्यांच्या रनिंग ची नवीन पिढीला विशेष ओळख निर्माण झाली. यानंतर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सर्व धावपटूंनी श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी डॉ. स्वाती फालक ,पूनम भंगाळे, ङाॅ. चारुलता पाटील या महिला धावपटूंनी देखील सहभाग नोंदविला. यावेळी बाजारपेठ पोलिस स्टेशनचे एपीआय श्री गणेश धुमाळ हे देखील उपस्थित होते.
या रनमध्ये मुकेश चौधरी, तरुण बिरिया, संतोष घाडगे, अजय अंबेकर, गणसिंग पाटील ,प्रकाश अटवाणी, जय मनवानी, अशोक पाटील ,निर्मल बलके, विजय पाटील ,विलास पाटील ,निलेश लाहोटी, अंकित पोद्दार, प्रवीण वारके ,रंजीत खरारे ,सारंग चौधरी, महेश फिरके ,प्रवीण पाटील या धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला.



