भुसावळ नाहाटा महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा :

भुसावळ -येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ. एम. व्हि. वायकोळे मॅडम होत्या. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आर. एन. शेवाळे ( एस. एम. कॉलेज मुक्ताईनगर) हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, भुसावळ तालुका राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.डॉ. पी. ए. आहिरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र नाडेकर, डॉ.डी. एम. टेकाडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास महिरे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ममताबेन पाटील, प्रा. भूषण धनगर व एन. एस. एस. चे स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजेंद्र नाडेकर यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करून शिक्षक दिन व गुरु शिष्य नात्याच्या विविध उदाहरणांचे स्पष्टीकरण दिले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.


प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आर. एन. शेवाळे ( एस. एम. कॉलेज मुक्ताईनगर) यांनी “राष्ट्र निर्मितीत शिक्षकांची भूमिका” या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. राष्ट्र निर्मितीमध्ये विविध नेतृत्वाच्या योगदानाने राष्ट्रकारण व समाजकारणाला दिशा मिळण्यात शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण आहे. कोणतीही चळवळ निर्माण होण्यात व नेतृत्वाची निर्मिती होणे शिक्षकांशीवाय अशक्य आहे हे स्पष्ट केले. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा निर्माण होणाऱ्या विविध महापुरुषांमध्ये बहुतांशी शिक्षक होते. त्यामुळे राष्ट्र निर्मितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.
काही विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. कुमार रोहित पुलीवार व कुमारी प्रणाली बारी यांनी आपले शिक्षक दिनाबाबत मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. एम. व्हि. वायकोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुरू-शिष्याच्या अखंड परंपरेच्या भारतीय इतिहासाच्या विविध उदाहरणांचे दाखले दिले. शिक्षकांची भूमिका आई प्रमाणे संस्कार व वैचारिक नितीमुल्ये देण्याची असते. covid-19 च्या काळात शिक्षकांच्या विविधांगी भूमिकेचे त्यांनी दाखले दिले. विद्यार्थ्यांना आई वडील व गुरुजनासारखा दुसरा कोणताही शुभचिंतक नसल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाच्या डॉ. डी.एम. टेकाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.ममताबेन पाटील, प्रा. भूषण धनगर यांनी सहकार्य केले.
कुमार आदित्य हिवरे व कुमारी वैष्णवी ठाकूर यांनी सुंदर असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध स्वयंसेवकांनी तसेच राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रासेयोचे विविध स्वयंसेवक उपस्थित होते. कोमल नेवे हर्षल चव्हाण, चेतना पाटील, सागर सोनवणे, सागर पाटील, वैभव पाटील, शुभम सोनार, आकाश बोदडे, स्वप्नील डोळसे, आकाश सपकाळे, एकता बजाज, गायत्री बजाज, संजना दुधानी, कल्याणी पराळे यांसारखे विविध विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य ए. डी. गोस्वामी व डॉ. एन. इ. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.