प्रकल्प बाधित वेल्हाळे सहा परिसरातील बेरोजगार तरुणांची शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याकडे धाव :


भुसावळ – औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर ने सर्वात जास्त प्रकल्पबाधित असलेले वेल्हाळा व परिसर येथील बेरोजगार तरुणांनी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे घर गाठत न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन दिले
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 30 ऑगस्ट रोजी वेल्हाळे सह परिसरातील बेरोजगार तरुणांनी दीपनगर येथील प्रकल्पबाधित गावातील असल्याने दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रामार्फत रोजगार उपलब्ध व्हावा अशी रास्त मागणी केली आहे दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांनी बऱ्याच लोकांशी स्थानिक लोकप्रतिनिधींची वैयक्तिक भेट घेऊन व्यथा मांडल्या परंतु त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले वेल्हाळेसह परिसर हा ओशनिक विद्युत केंद्रातील राखेमुळे त्रस्त आहे तसेच या परिसरात दीपनगर केंद्रातून निर्माण होणारी राख मोठमोठे बंड करून सोडली जाते ती सुकल्यानंतर परिसरात उडते पिकांवर उडते त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त आहेत त्याच बरोबर जमिनी अधिग्रहीत झाल्याने शेती कमी झाल्याने शेतमजुरांची रोजगाराची पंचाईत झाली आहे रोजगार उपलब्ध नसल्याने राखेच्या गाड्या भरणे हा एकमेव रोजगार उपलब्ध होता परंतु येथील स्थानिक पुढाऱ्यांच्या काही हस्तकांनी तो रोजगार देखील मजुरांचा हिरावून घेतला व जेसीबीच्या सहाय्याने तसेच ट्रॅक्टर वरील लोडर च्या साह्याने राखेच्या गाड्या ट्रॅक्टर ट्रक भरायला सुरुवात केली व आता जो होता तो गाड्या भरण्याचा रोजगार देखील गेला त्यामुळे वेल्हाळे सह परिसरामध्ये बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे एवढ्या सर्व असं विद्युत केंद्रा मुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे सर्व सहन करूनही बेरोजगारी वाढत आहे संबंधित असलेली विद्युत केंद्रात अधिक चौकशी केली असता नवीन 660 मेगावॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या नवीन प्रकल्पाचे काम सुरू आहे तेथील संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली असता ते फक्त ऐकून घेतात व कुठलीही कार्यवाही करत नाही तसेच त्यांनी सर्व नागपूर भागातून तसेच इतर राज्यातून मजूर आणून कमी पैशांमध्ये अधिक श्रम करून घेऊन काम सुरू ठेवले आहे स्थानिक बेरोजगार हे प्रगत आणि कुशल असून देखील त्यांना कामासाठी सामावून घेतले जात नाही परिसरातील काही ठराविक लोकप्रतिनिधी फक्त ठराविक लोकांसाठी आंदोलने करतात असा वेल्हाळे सहा परिसरातील बेरोजगारांचा आरोप आहे त्यासाठी त्यांना शिवसेनाच न्याय देऊ शकते म्हणून त्यांनी जिल्हाप्रमुख यांच्या कडे जाऊन आपल्या व्यथा मांडल्या व निवेदन सादर केले शिवसेना जिल्हा प्रमुखांनी त्यांना नामदार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून चर्चा करून संबंधित प्रशासनाची चर्चा घडवून आणून हा स्थानिक बेरोजगारीचा प्रश्न योग्य पद्धतीने सोडविण्याचे आश्वासन दिले व त्यासाठी 660 प्रकल्पाचे मुख्य अभियंता श
विवेक रोकडे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करत दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता चर्चेची वेळ मागून घेतली यावेळी चर्चा करून त्यामध्ये स्थानिक बेरोजगारांच्या प्रतिनिधींसह अधिकार्‍यांशी चर्चा करून पुढे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यात येईल असे सांगितले याआधी देखील शिवसेनेने स्थानिकांना रोजगार मिळावा अशे कसोशीने प्रयत्न केलेले आहेत व स्थानिकांना न्याय मिळवून दिलेला आहे त्यामध्ये आताच स्थानिकांना डावलून महानिर्मिती कंपनी सुरक्षारक्षकांचा ठेका एम एस एफ या कंपनीला देणार होती तो पूर्वीप्रमाणे स्थानिकांना द्यावा यासाठी प्रयत्न केले व त्या प्रयत्नात देखील यश आले आहे आता लवकरच स्थानिक बेरोजगारांची भरती सुरक्षारक्षकांना मध्ये होणार आहे हे देखील यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी नमूद केले यावेळी निवेदन देताना वेल्हाळे सह परिसरातील वेल्हाळे शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण पाटील मिलिंद पाटील जयेश पाटील हितेश कोलते खुशाल चौधरी स्वप्निल चौधरी वैभव महाजन भूषण महाजन हर्षल झांबरे सचिन पाटील मोहन चौधरी लोकेश पाटील लवकेश चौधरी निलेश पाटील निलेश पाटील राजेश पाटील जितेंद्र पाटील विठ्ठल गोसावी शुभम चौधरी हर्षल चौधरी प्रशांत कुरकुरे ज्ञानेश्वर कोलते मयुर पाटील करण बेलदार विपुल झांबरे गौरव पाटील यांच्यासह परिसरातील बेरोजगार उपस्थित होते