भुसावळ – सत्ता कोणाचीही असो आपली नाळ कायम गरीब,सामान्य माणसाशी ठेवा ,आंदोलन करताना संपूर्ण अभ्यास पाहिजे तरच आंदोलन यशस्वी होत असते संघटनेत एक विचार असला तरच संघटना वाढते जनतेचा विश्वास आहे तरच प्रहार जनशक्ती पार्टी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक मंगळवारी ३१ रोजी दुपारी शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात ते बोलत होते. बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांची प्रमुख उपस्थिती राहिल.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने महाराष्ट्रात जिल्हा, तालुका आणि गाव पातळी पर्यंत पक्ष संघटनेच्या कार्यप्रणालीची समीक्षा करून आढावा घेतला जात आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिति समजून घेण्यासाठी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी आढावा बैठकीचे घेतली. यावेळी पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील गावंडे म्हणाले की लोकांची सेवा हा आपला पाया असून तो अधिक मजबूत झाला तरच प्रहार मजबूत होईल. त्यासाठी सुरू होणारी राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहीम मोठा जोर लावत यशस्वी करा. आजवर काम किती केले यापेक्षा प्रहारशी किती लोक जोडले यावरून मोजमाप होणार आहे. लोकांच्या प्रश्नावर आंदोलने हे आपले महत्वाचे अंग आहे त्याची आठवण ठेऊन सत्ता कोणाचीही असो आपली नाळ कायम गरीब,सामान्य माणसाशी ठेवा
आज पक्षांमध्ये नामदार बच्चू कडू यांना सर्वजण प्रेम करतात त्यांनी समाजकार्यासाठी आपले योगदान दिले आहेत्याचप्रमाणे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ही आपला योगदान द्यावा आज राज्यात व जिल्ह्यात एकही तालुका असा नाही का तिथे संघटना नाही सर्व ठिकाणी संघटनेचे कार्य सुरू आहेतसेच तालुका स्तरावर काम सुरू आहे प्रहार जनशक्ती पार्टीची 9ऑगस्ट ते 23 सप्टेंबर पर्यंत सभासद नोंदणी सुरु आहे सभासद नोंदणी करताना घरापासून सदस्य नोंदणी झाली पाहिजे तरच संघटना नोंदणी ला प्राधान्य नोंदणीला मिळेल स्वयंपुर्ती ने सदस्य नोंदणीला तयार होणारच सदस्य नोंदणी करावी तरच संघटना मजबूत होईल पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी दीडशेपेक्षा जास्त रक्तदान करूनरक्तदान केलेत्यानंतर रक्तदान कार्यक्रम आयोजन करण्यात आले येणाऱ्या काळात निवडणुका लढवायची असेल तर आपलास्वताची नियोजन करा निवडणुका कोणत्या असो आपली लढण्याची तयारी असायला पाहिजे येणाऱ्या भुसावळ नगरपालिका निवडणुकीत प्रहार जनशक्ती पाठीचा वर्चस्व राहीलअसेही त्यांनी सांगितले राजकारण हे सध्याचे हमी योजना झाले आहे पक्षाला निवडणूक सवय लढवायची आहे येणाऱ्या विधानसभेत चार पाच जिल्ह्यात नियोजन असून किमान दहा जाग्या आपले कसे निवडून येतील ते विधानसभेत गेल्यावर नागरिकांच्या समस्या मानतील असे पक्ष धोरण आहे असे ही गवां डे यावेळी म्हणाले. बैठकीला व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, सुधाकर खुमकर, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, अँड.नंदिनी चौधरी, जिल्हा आघाडी प्रमुख राजेश्री नेवे, जिल्हातील प्रहार तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल चौधरी यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला बळकटी प्राप्त झाली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोने करण्याची संधी असल्याचे मत युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले..
भुसावळ झालेल्या आढावा बैठकीच्या बाबतीत बोलत असताना प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले कि बाळासाहेब ठाकरे नंतर जो नेता आवडला असेल त्याच नाव बच्चू कडू, संघटनात्मक बांधणी या विषयांवर मार्गदर्शन केले. तळागळातील कार्यकर्ता हाच प्रहार पक्षाची खरी ताकद आहे प्रहार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आणि सक्षम व्हावा म्हणून आपला प्रयत्न राहिला पाहिजे प्रहार जनशक्ती पार्टी हा संघर्षातून झालेला पक्ष आहे हापक्ष कधीही न समपणारा पक्ष आहे येणाऱ्या काळात पक्षाची वाटचाल जोमाने सुरू राहील राजकारणात काम करताना चौधरी बंधूंना कसं थांबविण्यात येईल असे राजकारणात नियोजन केले जातात ते कधीही विरोधकांना शक्य होणार नाही आमचे कार्य सुरूच राहतील येणारा काळ हा प्रहार जनशक्ती पक्षाचा राहील पहिली आढावा बैठक असून चांगला प्रतिसाद मिळाला आहे यानंतर आढावा बैठक झाली तर दहा हजारापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती राहील असे ही अनिल चौधरी म्हणाले. या जिल्हा बैठकीत जिल्ह्यातील सर्व शहर आणि तालुक्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती
या सर्वांची पद नियुक्ती करण्यात आली.
प्रहार युवती आघाडी जळगाव जिल्हाध्यक्षा नंदिनी अनिल चौधरी, प्रहार रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाउपाध्यक्ष संजय आवटे, प्रहार जळगाव जिल्हाउपाध्यक्ष रामचंद्र पाटील, प्रहार जळगाव जिल्हाउपाध्यक्ष विलास पांडे, प्रहार शेतकरी आघाडी जिल्हाउपाध्यक्ष गणेश बोरसे, प्रहार जळगाव जिल्हा सरचिटणीस शामकांत पाटील, प्रहार यावल तालुकाध्यक्ष सुभाष सोनावणे, प्रहार अमळनेर तालुकाध्यक्ष गुलाब पाटील, प्रहार महिला आघाडी शहराध्यक्ष अलिसान बी शेख ईकबाल, प्रहार यावल शहराध्यक्ष तुकाराम बारी, प्रहार भुसावळ शहराध्यक्ष प्रकाश कोळी (खन्ना), चोपडा युवक आघाडी शहराध्यक्ष रुपम पाटील, अमळनेर युवक तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, यावल युवक आघाडी शहराध्यक्ष राहुल कचरे, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष राहुल पवार, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्ष जयेश चोपडे, यावल सोशल माडिया प्रमुख आसिफ खान, यावल युवक आघाडी शहरउपाध्यक्ष नितीन बारी.सूत्रसंचालन भूषण चौधरी यांनी केले



