भुसावळ –
ऑनलाईन शिक्षणाच्या युगात, जेथे सर्वकाही ऑनलाइन होत आहे, हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय भुसावळच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाच्या टीम “कॉम्प-बॉट् इनोव्हेशन लॅब” ने सर्व विद्यार्थ्यांसाठी 25 ऑगस्ट 2021 रोजी ज्ञान धारण करण्यासाठी विनामूल्य राष्ट्रीय स्तरावरील क्विझ “क्विझटेक स्पर्धा” आयोजित केली होती.

या स्पर्धेत संपूर्ण भारतातील अनेक शहरातील विविध महाविद्यालयांतील विशेषता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, M.I.T.E कर्नाटक आणि एकूण 300+ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
तीन विजेत्यांनी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रोपार मधील अमन माथूरने प्रथम स्थान मिळवले. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), दुर्गापूर येथील कौशल बैद यांनी द्वितीय आणि कोयंबटूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (सीआयटी), कोयंबटूर येथील अश्वथ कुमार डी यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
टीम कॉम्बोट्झचे मार्गदर्शक आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश डी. पाटील यांनी टीम कॉम्बोट्झच्या सदस्यांना प्रोत्साहन देऊन महत्वाची भूमिका बजावली. टीम हेड सोहेल हमीद कच्छी यांनी त्यांच्या टीम सदस्य संजना संजय परदेशी, पूजा हेमंत पाटील, रुद्रतेज जाधव, श्रावणी बापू चौधरी, गायत्री सपकाळे, गिरीश महाजन, राहुल विश्वकर्मा, धनश्री चौधरी आणि मानसी भावसार यांच्यासह या स्पर्धेचे नियोजन आणि यशस्वीरित्या आयोजन केले.
हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल, सचिव एम. डी. शर्मा, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, अकॅडमीक डीन डॉ. आर. बी. बारजिभे, कॉम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. पाटील व सर्व शिक्षक वृंदने विजेतांचे अभिनंदन व आयोजकांचे कौतुक केले.


