भुसावळ – येथील स्वर्गीय दगडाबाई चंपालाल जी बियाणी या शैक्षणिक संस्थेने चालवलेल्या बेकायदेशीर शाळा व संस्थेच्या इतर गंभीर बेकायदेशिर बाबींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली होती त्यानुसार कारवाई होऊन अहवाल सादर न झाल्याने शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी दिले आहेत.

येथील स्वर्गीय दगडाबाई चंपालाल जी आणि शैक्षणिक संस्थेने चालू केलेल्या बेकायदेशीर शाळा व संस्था इतर गंभीर बाबींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सानप यांनी केले होते त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी चौकशी करून चौकशीअंती तक्रारीत तथ्य आढळून आल्यास स्वयं स्पष्ट शिफारस व कागदपत्रांसह अहवाल सादर करणे बाबत वेळोवेळी निर्देश देण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत शिक्षण संचालकांना अहवाल प्राप्त झालेला नाही. याबाबत संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्यानुसार प्राथमिक चौकशी अधिकाऱ्याकडे सोपविले आहे त्यांनी सदर कामी विलंब केल्याबाबत शासन निर्णय 7 मार्च 2015 अन्वये शिस्तभंगाची कारवाई करून दोषारोपपत्र तात्काळ या कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले आहे परंतु प्रकरणी देखील कोणतीही उलटतपासणी प्राप्त झालेली नाही माहिती अधिकार कार्यकर्ते सानप यांनी शिक्षण आयुक्त नाशिक यांच्याकडे कुपोषणाबाबत निवेदन दिले आहे याबाबत कार्यालयाकडून वरिष्ठांकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील संबंधित शिक्षणाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने कार्यालयाकडे अथवा वरिष्ठांकडे केलेला दिसून येत नाही त्यावर संबंधित शिक्षणाधिकारी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेश जुमानत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. संबंधित शिक्षण अधिकारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली 1979 मधील नियम क्रमांक तीन चा भंग केला असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस शिक्षण उपसंचालकांनी जिप मुख्य कार्य अधिकारी यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.


