रोटरॅक्टमध्ये काम केल्याने तरूणांना मिळते एक नवी दिशा – रमेश मेहेर : डीस्ट्रीक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटीव्ह पदग्रहण समारंभ ;

भुसावळ – रोटरी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. रोटरीत काम करत असताना आपल्या मुलांवर देखील चांगल्या संस्काराची रूजवण व्हावी तसेच त्यांच्यात देखील सामाजीकतेचे भान असले पाहिजे यासाठी रोटरॅक्ट आहे. या माध्यमातून तरूणांच्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांना वाव मिळत असतो. आपल्या वयातील तरूणांच्या चांगल्या गुणांची देवाण घेवाण करत सक्षम बनण्यामधे मदत करत असते. रोटरी क्लब व रोटरॅक्ट दोघांनी एकत्र येत समाजासाठी सामाजीक व शैक्षणिक कामावर भर दिला पाहिजे. रोटरॅक्ट मधे तयार होणारा प्रत्येक तरूण हा भविष्यातील रोटरीचा आधारस्तंभ आहे. याकरीता रोटरीच्या प्रत्येक सदस्याने आपल्या मुलांना रोटरॅक्ट मधे सामाविष्ट करावे. रोटरॅक्ट मधे काम केल्याने तरूणांना वेगळी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन डीस्ट्रीक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांनी केले.
रोटरी भवन डीयेथे स्ट्रीक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटीव्ह पदग्रहण समांरंभ आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी प्रांतपाल राजीव शर्मा, इनरव्हील च्या प्रांत अध्यक्षा अश्वीनी गुजराथी, सेरीक एमडीआयओ चे अध्यक्ष कौशल साहु, डॉ. रश्मी शर्मा, उमेश नेमाडे, सुहास अग्रवाल, संजू भटकर, जी. आर. ठाकुर, राजेंद्र फेगडे, डॉ. सुधीर शर्मा, आदिल खान, जीवन महाजन, राजेंद्र यावलकर, मुकेश प्रताप सिंग, शंतुनु अग्रवाल, संगीता पाटील, प्रसन्न गुजराथी आदि उपस्थीत होते.


यावेळी प्रथमच नाशिक ते नागपुर पर्यंतच्या ११३ डीस्ट्रीक्ट रोटरॅक्ट क्लब चे डीआरआर पद लोकेश कांसल यांच्या रूपाने भुसावळला मिळाले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रांतपाल रमेश मेहेर यांनी डीआरआर लोकेश कांसल यांना अध्यक्षपदाची तर सेक्रेटरी पदाची पुर्वेश मोकाळकर यांना पिन देवून पदभार दिला. यानंतर लोकेश कांसल यांचा रोटरॅक्ट मधील प्रवासा बाबत ची माहीती वेदश्री फालक व काजल कांसल यानी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अपूर्वा फेगडे आणि रिया चांदवानी यांनी तर आभारप्रदर्शन पूर्वेश मोकाळकर यांनी केले.

प्रसिध्दीच्या मागे धावू नका यश मिळेल…
आजच्या सोशल मिडीच्या माध्यमातून प्रत्येक जण फक्त प्रसिध्दीच्या मागे धावत असतात. जास्तीत जास्त वेळ सोशल मिडीयावर घालवत असतात. तरूणाचा जीवनातील या काळातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या कतृत्वाने समाजावर सकारात्मक ठसा उमटविला पाहिजे. रोटरॅक्ट मधे आलेले सदस्य नशिबवान आहेत. या संधीचे सोने करा व प्रसिध्दीच्या मागे न धावता कामावर भर द्या म्हणचे यश निश्चीत मिळेल. असे प्रतिपादन माजी प्रांतपाल राजवी शर्मा यांनी केले..

रोटरॅक्टमध्ये चांगले संस्कार
रोटरॅक्ट च्या माध्यमातून विविध संधी तरूणांना मिळत असतात. तसेच त्यांना सामाजीक कार्याचे प्रात्यक्षिक मिळत असल्याने त्यांच्या मध्ये नैराश्य कधीच येत नाही. प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होत असते. त्यांच्या मध्ये सांघीकतेची भावना निर्माण होवून चांगल्या संस्कारांची रूजवण होत असते. असे प्रतिपादन इनरव्हील प्रात अध्यक्षा अश्वीनी गुजराथी यांनी केले..
कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर कुमार पाचपांडे यांचे सहकार्य लाभले..

डास्ट्रीक्ट रोटरॅक्टमध्ये यांचे झाले पदग्रहण
डीआरअर लोकेश कांसल, डीआरटी शंतनु अग्रवाल, फाऊंडेशन कमीटी चेअर अभिषेक गोयल, को ट्रेनर सनईल अहमद, सेक्रेटरी पुरर्वेश मोकाळकर, ट्रेझरर प्रतीक चौधरी, जॉईन्ट ट्रेझरर सलोनी भगवानी, एआयडी निलेश चौधरी, एडीआरआर आशिष निकम, प्रितम सिंग, सचिन पुरवार, क्रिष्णा सिंग, भावेश कुंभारे, समित यावलकर, पियुष अंधारे, करण गडोडीया, अभिषेक पवार, विराज पहाडे, परीजत येवले, सौरभ, जरीयल, अपुर्व हुमने, नंदिनी रबरा, ओम महाजन, गुणवंत नारखेडे, मयुरी घनगरे, हिमांशु त्रीपाठी, हरगुनसिंग कोछार, अभिषेक अग्रवाल, गौरव वालमीक, दिया शहा, साहील फाडके, निशिगंधा उपासनी..

रोटरॅक्ट क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीमध्ये यांचे पदग्रहण झाले…
अध्यक्ष डॉली दुधानी, सचीव व्टिंकल परदेशी, कोषाध्यक्ष महिमा जैन, डायरेक्टर अपूर्वा फेगडे, वैदश्री फालक, हर्षल वानखेडे, निखील बोंडे, सचिन ललवाणी, सुमीत यावलकर..