जळगावात परदेशी बनावटीच्या पिस्टलासह चार काडतूस जप्त –

जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगरातील एका मिस्तरी काम करणार्‍या विनोद बापू शिंदे (32, रा.राजपूतनगर, हरिविठ्ठलनगर) या तरुणाकडे पाच लाख रुपये किंमतीचे परदेशी पिस्टल व चार जिवंत काडतूस सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संशयीत गेल्या काही दिवसांपासून पुण्यास गेला होता. सोमवारी सकाळी सात वाजता तो खाजगी ट्रॅव्हल्सने जळगावात आला. त्याच्याकडे पिस्तूल उअसल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, तांत्रिक माहिती घेण्यासाठी हे पिस्तूल कलिना येथे पाठवण्यात येणार असून पिस्तूल चोरीचे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.