भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील जिल्हा परीषद शाळेतील एका खोलीतून चोरट्यांनी चार संगणक, सीपीयु, की बोर्ड व माऊस लांबवल्याची घटना नुकतीच घडली.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 24 वर्ग खोल्या असलेल्या या शाळेमध्ये चार महिला शिक्षिका कार्यरत असून विद्यार्थी संख्या एकूण 89 इतकी आहे. यापूर्वीदेखील शाळेत अनेकादा चोरीचे प्रकार घडल्याने पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शाळेच्या परीसरात टवाळखोरांचादेखील वावर वाढल्याने पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच चोरट्यांनी खिडकीच्या आसार्या वाकवत खोलीतून चार संगणक संच लांबवले. 13 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिका शबनम रहिमोद्दीन देशमुख (भुसावळ) यांनी तालुका पेालीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



