भुसावळ –
जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा युरोपमधील पोलांडमध्ये नुकतीच झाली. या स्पर्धेत बुलढाणा येथील मिहिर अपार याने अमेरीकेला हरवत पोलंमध्ये तिरंगा रोवत सुवर्णपदक पटकावले.

मिहिरचे आई-वडील हे बुलढाणा येथे शिक्षक असून तो दहावीचा विद्यार्थी आहे. दिल्लीत केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी स्वागत केल्यानंतर त्याचे भुसावळात कर्नाटक एक्स्प्रेसने आगमन होताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिवाणसिंग राजपूत यांनी सह परीवारत त्याचे स्वागत केले तसेच लोहमार्ग अधिकारी व कर्मचार्यांनीही त्यास शुभेच्छा दिल्या. राखुंडे, केरूरकर, इगंळे, एएसआय भरत शिरसाठ, पांडुरंग वसु तसेच ए.वन.सपकाळे, गोपी राजपूत, रोहित राजपूत सौरभ राजपूत उपस्थित होते.


