भुसावळ – डीआरएम कार्यालयात दोन लाख 40 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआय पथकाने अटक केलेले अभियंता एम.एल. गुप्ता व कार्यालय अधीक्षक्ष संजीव रडे यांना 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला असून शनिवारी त्यांची सुटका करण्यात आली. संशयीताच्या सीबीआय कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड.बी.डी.गामोट यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तो मंजूर केला.
अखेर दोघांची जामिनावर सुटका
डीआरएम कार्यालयातील विशेष बांधकाम अभियंता एम.एल. गुप्ता यांनी ठेकेदाराकडून दोन लाखांची तर कार्यालय अधीक्षक संजीव रडे यांनी सुध्दा 40 हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर नागपूर येथील सीबीआयच्या पथकाने दोघांना अटक केली होती. सुरुवातीला आरोपींना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती तर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता सीबीआयच्या अधिकार्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याने
न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
सीबीआयचा मोर्चा आता अधिकार्यांकडे
गुप्ता व रडे यांच्या माहितीवरून याप्रकरणी सीबीआयचे अधिकारी हे आता डीआरएम कार्यालयातील अन्य अधिकार्यांची चौकशी करणार आहे. सीबीआयच्या अधिकार्यांकडे बर्याच्या जणांच्या नावाची यादी आहे, त्यामुळे आता कोणा-कोणाची चौकशी केली जाईल, याकडे लक्ष लागले आहे.
बर्हाणपूरच्या घरात मिळाले सोने
तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत अधिकार्यांनी गुप्ता यांना बर्हाणपूर येथे त्यांच्या नेथील घरी नेले होते, बर्हाणपूर येथील निवासस्थानी काही कागदपत्रे, सोन्याचे दागिणे असा मुद्देमाल मिळाला. तर पुणे येथील फ्लॅट हा रिकामा होता, असे सूत्रांनी सांगितले.



