–
जळगाव : यावल तालुक्यातील दहिवद येथील व्यापार्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून 10 लाख 30 हजारात गंडवणार्या दोघा भामट्यांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सुनीलकुमार सहानी ब्रम्हदेव उर्फ अनिलकुमार (38, रा.गुनाबस्ती पोस्ट तेजपूर जि.समस्तीपुर (बिहार) व कन्हैय्याकुमार सहानी राजेंदर सहानी (43, रा.बेलीया घाट, मेन रोड कलकत्ता) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

डिलरशीप देण्याच्या आमिषाने केली फसवणूक
दहिगाव, ता.यावल येथील कालिदास विलास सूर्यवंशी (33, रा. एसबीआय भरणा केंद्र, दहिगाव) यांना 18 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 दरम्यान एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. समोरील व्यक्तीने आशितोष कुमार असे बनावट नाव सांगून उज्जवला गॅस एजन्सीची डिलरशीप देण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रे खरी भासविली. तसेच उज्जवला गॅस एजन्सी नावाचे बनावट ऑनलाईन पोर्टल बनविले होते. त्यांनी वेगवेगळे कारणे सांगून कल्लिदास सुर्यवंशी यांच्या खात्यातून एकूण 10 लाख 33 हजार रुपये लंपास गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी कालिदास सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या पथकाने सुनीलकुमार सहानी ब्रम्हदेव उर्फ अनिलकुमार (38, रा.गुनाबस्ती पोस्ट तेजपूर जि.समस्तीपुर (बिहार) व कन्हैय्याकुमार सहानी राजेंदर सहानी (43, रा.बेलीया घाट, मेन रोड कलकत्ता) या आरोपींना अटक केली.


