दिव्यांग नागरिकांसाठी राखीव असलेल्या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांविरोधात आरपीएफची विशेष मोहीम :

दिव्यांग नागरिकांसाठी राखीव असलेल्या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांविरोधात आरपीएफची विशेष मोहीम :
मुंबई –
उपनगरीय गाड्यांमध्ये दिव्यांगजनसाठी राखीव असलेल्या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशां विरोधात रेल्वे सुरक्षा दलातर्फे दि. २.८.८.२०२१ ते १६.८.२०२१ या पंधरवाडया दरम्यान दादर रेल्वे स्थानकावर विशेष मोहीम राबविण्यात आली.
यावेळी अनधिकृत प्रवास करणाऱ्या एकूण ५७ व्यक्तींना पकडण्यात आले, तसेच रेल्वे कायद्याच्या कलम १५५ अन्वये त्यांना रोखण्यात आले आणि दंड करण्यात आला.

दि. २ ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ३० व्यक्तींना पकडण्यात आले आणि १० ते १६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत २७ व्यक्तींना पकडण्यात आले.
रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी दिव्यांगजनासाठी आरक्षित डब्यात प्रवास करू नये असे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे.