भुसावळ – सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था जळगाव आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन शुक्रवार दिनांक 20 ऑगष्ट 2021 रोजी करण्यात आले आहे .

डॉ विवेक चौधरीं यांचे गजानन हार्ट अँड आय हॉस्पिटल , 370 – ओंकार नगर , बीएसएनएल ऑफिस समोर जळगाव येथे आयोजित या शिबिरात कॉन्सुलेशन, ईसीजी, शुगर याची तपासणी सकाळी 11 ते 2 दरम्यान करण्यात येणार आहे . तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सखी श्रावणी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ राजेश्री नेवे यांनी केले आहे . शिबिरात- कोविड १९ च्या त्रिसुत्री नियमांचे पालन केले जाईल,
विनामास्क प्रवेश नाहि. याची नोंद घ्यावी


