जळगावातील आठ सहा.पोलीस निरीक्षकांसह नाशिक परीक्षेत्रातील 19 सहा.निरीक्षकांच्या बदल्या – 6 अधिकारी जळगाव जिल्ह्यात नव्याने बदलून येणार : 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही विनंती बदल्या


जळगाव – नाशिक परीक्षेत्रातील बदली कालावधी पूर्ण झालेल्या 19 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अश्‍वती दोर्जे यांनी मंगळवार, 17 रोजी काढले. बदल्या झालेल्या अधिकार्‍यांमध्ये जळगावच्या आठ सहा.निरीक्षकांसह नंदुरबारच्या एका निरीक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, अन्य पाच सहाय्यक निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात नव्याने सहा अधिकारी बदलून येत आहेत.

या सहा.पोलीस निरीक्षकांच्या जनरल बदल्या (कंसात कोठून व कंसाबाहेर कुठे)
दिलीप राठोड (अहमदनगर) जळगाव
योगेश मेहुणकर (धुळे) नाशिक ग्रामीण
दिलीप खेडकर (धुळे) नाशिक ग्रामीण
रमेश चव्हाण (धुळे) जळगाव
सचिन बेंद्रे (जळगाव) धुळे
प्रकाश वानखेडे (जळगाव) नंदुरबार
राजेश काळे (जळगाव) अहमदनगर
हनुमान गायकवाड (जळगाव) धुळे
प्रकाश सदगीर (जळगाव) मुदतवाढ
संदीप आराक (जळगाव) नंदुरबार
रवींद्र जाधव (जळगाव) नाशिक ग्रामीण
रवींद्र बागुल (जळगाव) अहमदनगर
दिगंबर शिंपी (नंदुरबार) धुळे
विलास तोटीकौडलवार (नाशिक ग्रामीण) निलंबीत असल्याने सध्याच्या घटकात
गणेश गुरव (नाशिक ग्रामीण) जळगाव
जालिंदर पळे (नाशिक ग्रामीण) जळगाव
शिवचरण पांढरे (नाशिक ग्रामीण) मुदतवाढ
आशिककुमार आडसुळ (नाशिक ग्रामीण) जळगाव
मच्छिंद्र दिवे (नाशिक ग्रामीण) जळगाव
या सहा.पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या (कंसात कोठून व कंसाबाहेर कुठे)
राजेश गवळी (अहमदनगर) नाशिक ग्रामीण
पूनम राऊत (धुळे) नाशिक ग्रामीण
मयूर भामरे (जळगाव) धुळे
सचिन जाधव (जळगाव) अहमदनगर
शिवाजी बढे (नाशिक ग्रामीण) जळगाव